विवाहेच्छुक जैन युवक-युवती परिचय मेळावा
शनिवार दि. २२ जानेवारी २०२२ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ७ व
रविवार दि. २३ जानेवारी २०२२ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ७
मेळावा फी - १४/१/२०२२ पर्यंत रु २२००/- व १४/१/२०२२ नंतर रु २३००/-
snehbandhjain007@gmail.com

स्नेहबंध मेळाव्यासंबंधी माहिती

आम्ही या मेळाव्याचे संयोजक  , आपल्या धर्मातील मुला - मुलींचे लग्ने जमवून आणण्याचे सातत्याने काम करीत आहोत . तसेच दिगंबरात खंडेलवाल ,हुम्मड ,
शैतवाळ , कासार ,बोगार,चतुर्थ ,पंचम व इतर बऱ्याच काही उपजाती आहेत .शिवाय दिगंबर-श्वेतांबर पंथभेत  आहेत . हिंदी , राजस्थानी ,गुजराथी ,मराठी ,कन्नड भाषाभेद आहेत .

आशा परस्थितीत आता धर्मबांधवांकडुनच मागणी येत आहे कि, या तथाकथित भिंती पडून आपण एक होऊ या. तिर्थंकरचरणीच आपल्या निष्ठा अटळ आहेत तर मग भेद कोठे उरतो ?
तर मग आम्ही समविचारी आपणास या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करण्याचे व  तेथे आल्यावर उपजाजी - पंथ - भाषाभेद विसरून अनुरूप जीवनसाथी मिळवण्याचे आवाहन करीत आहोत .
विवाह हा जीवनातील महत्वाचे टप्पा आहे .अनुरूप जीवनसाथी मिळणे भाग्याची गोष्ट आहे. त्यात जर उमेदवार शिक्षित असेल ,स्वतंत्र विचारांचा असेल ,प्रगल्भ बुद्धीचा व संवेदनाक्ष मनाचा असेल तर वेव्हलेन्थ जमणारा जोडीदार मिळवणे थोडे अधिक कष्टाचेच आहे. त्यासाठीच शोधण्यास अधिक वाव मिळावा म्हणून आमचा हा प्रयत्न.
आपण येथे याला , सर्वाना आपली ओळख करून द्याल , त्यांची माहिती मिळवाल , त्यांच्याबरोबर दिवसभर संपर्क ठेवाल व त्यातून ओळखी वाढवू न अनुरूप साथीदार शोधाल याची खात्री आहे.

तर मग एकत्र येऊन आपण हा परिचय यशस्वी करू या !

 

स्नेहबंध मेळाव्यासंबंधी माहिती| संयोजक व संपर्क| फोटो गॅलरी| डाउनलोड फॉर्म| ऑनलाईन पेमेंट
web design and development